ब्रह्मोवाच
इति पृष्टा मया देवी विनयावनतेन च ।
उवाच वचनं श्लक्ष्णमाद्या भगवती हि सा ॥ १ ॥
देव्युवाच
सदैकत्वं न भेदोऽस्ति सर्वदैव ममास्य च ।
योऽसौ साहमहं योऽसौ भेदोऽस्ति मतिविभ्रमात् ॥ २ ॥
आवयोरन्तरं सूक्ष्मं यो वेद मतिमान्हि सः ।
विमुक्तः स तु संसारान्मुच्यते नात्र संशयः ॥ ३ ॥
एकमेवाद्वितीयं वै ब्रह्म नित्यं सनातनम् ।
द्वैतभावं पुनर्याति काल उत्पित्सुसञ्ज्ञके ॥ ४ ॥
यथा दीपस्तथोपाधेर्योगात्सञ्जायते द्विधा ।
छायेवादर्शमध्ये वा प्रतिबिम्बं तथावयोः ॥ ५ ॥
भेद उत्पत्तिकाले वै सर्गार्थं प्रभवत्यज ।
दृश्यादृश्यविभेदोऽयं द्वैविध्ये सति सर्वथा ॥ ६ ॥
नाहं स्त्री न पुमांश्चाहं न क्लीबं सर्गसङ्क्षये ।
सर्गे सति विभेदः स्यात्कल्पितोऽयं धिया पुनः ॥ ७ ॥
अहं बुद्धिरहं श्रीश्च धृतिः कीर्तिः स्मृतिस्तथा ।
श्रद्धा मेधा दया लज्जा क्षुधा तृष्णा तथा क्षमा ॥ ८ ॥
कान्तिः शान्तिः पिपासा च निद्रा तन्द्रा जराजरा ।
विद्याविद्या स्पृहा वाञ्छा शक्तिश्चाशक्तिरेव च ॥ ९ ॥
वसा मज्जा च त्वक्चाहं दृष्टिर्वागनृतानृता ।
परा मध्या च पश्यन्ती नाड्योऽहं विविधाश्च याः ॥ १० ॥
किं नाहं पश्य संसारे मद्वियुक्तं किमस्ति हि ।
सर्वमेवाहमित्येवं निश्चयं विद्धि पद्मज ॥ ११ ॥
एतैर्मे निश्चितै रूपैर्विहीनं किं वदस्व मे ।
तस्मादहं विधे चास्मिन्सर्गे वै वितताभवम् ॥ १२ ॥
नूनं सर्वेषु देवेषु नानानामधरा ह्यहम् ।
भवामि शक्तिरूपेण करोमि च पराक्रमम् ॥ १३ ॥
गौरी ब्राह्मी तथा रौद्री वाराही वैष्णवी शिवा ।
वारूणी चाथ कौबेरी नारसिंही च वासवी ॥ १४ ॥
उत्पन्नेषु समस्तेषु कार्येषु प्रविशामि तान् ।
करोमि सर्वकार्याणि निमित्तं तं विधाय वै ॥ १५ ॥
जले शीतं तथा वह्नावौष्ण्यं ज्योतिर्दिवाकरे ।
निशानाथे हिमा कामं प्रभवामि यथा तथा ॥ १६ ॥
मया त्यक्तं विधे नूनं स्पन्दितुं न क्षमं भवेत् ।
जीवजातं च संसारे निश्चयोऽयं ब्रुवे त्वयि ॥ १७ ॥
अशक्तः शङ्करो हन्तुं दैत्यान्किल मयोज्झितः ।
शक्तिहीनं नरं ब्रूते लोकश्चैवातिदुर्बलम् ॥ १८ ॥
रुद्रहीनं विष्णुहीनं न वदन्ति जनाः किल ।
शक्तिहीनं यथा सर्वे प्रवदन्ति नराधमम् ॥ १९ ॥
पतितः स्खलितो भीतः शान्तः शत्रुवशं गतः ।
अशक्तः प्रोच्यते लोके नारुद्रः कोऽपि कथ्यते ॥ २० ॥
तद्विद्धि कारणं शक्तिर्यथा त्वं च सिसृक्षसि ।
भविता च यदा युक्तः शक्त्या कर्ता तदाखिलम् ॥ २१ ॥
तथा हरिस्तथा शम्भुस्तथेन्द्रोऽथ विभावसुः ।
शशी सूर्यो यमस्त्वष्टा वरुणः पवनस्तथा ॥ २२ ॥
धरा स्थिरा तदा धर्तुं शक्तियुक्ता यदा भवेत् ।
अन्यथा चेदशक्ता स्यात्परमाणोश्च धारणे ॥ २३ ॥
तथा शेषस्तथा कूर्मो येऽन्ये सर्वे च दिग्गजाः ।
मद्युक्ता वै समर्थाश्च स्वानि कार्याणि साधितुम् ॥ २४ ॥
जलं पिबामि सकलं संहरामि विभावसुम् ।
पवनं स्तम्भयाम्यद्य यदिच्छामि तथाचरम् ॥ २५ ॥
तत्त्वानां चैव सर्वेषां कदापि कमलोद्भव ।
असतां भावसन्देहः कर्तव्यो न कदाचन ॥ २६ ॥
कदाचित्प्रागभावः स्यात्प्रध्वंसाभाव एव वा ।
मृत्पिण्डेषु कपालेषु घटाभावो यथा तथा ॥ २७ ॥
अद्यात्र पृथिवी नास्ति क्व गतेति विचारणे ।
सञ्जाता इति विज्ञेया अस्यास्तु परमाणवः ॥ २८ ॥
शाश्वतं क्षणिकं शून्यं नित्यानित्यं सकर्तुकम् ।
अहङ्काराग्रिमञ्चैव सप्तभेदैर्विवक्षितम् ॥ २९ ॥
गृहाणाज महतत्त्वमहङ्कारस्तदुद्भवः ।
ततः सर्वाणि भूतानि रचयस्व यथा पुरा ॥ ३० ॥
व्रजन्तु स्वानि धिष्ण्यानि विरच्य निवसन्तु वः ।
स्वानि स्वानि च कार्याणि कुर्वन्तु दैवभाविताः ॥ ३१ ॥
गृहाणेमां विधे शक्तिं सुरूपां चारुहासिनीम् ।
महासरस्वतीं नाम्ना रजोगुणयुतां वराम् ॥ ३२ ॥
श्वेताम्बरधरां दिव्यां दिव्यभूषणभूषिताम् ।
वरासनसमारूढां क्रीडार्थं सहचारिणीम् ॥ ३३ ॥
एषा सहचरी नित्यं भविष्यति वराङ्गना ।
मावमंस्था विभूतिं मे मत्वा पूज्यतमां प्रियाम् ॥ ३४ ॥
गच्छ त्वमनया सार्धं सत्यलोकं बताशु वै ।
बीजाच्चतुर्विधं सर्वं समुत्पादय साम्प्रतम् ॥ ३५ ॥
लिङ्गकोशाश्च जीवैस्तैः सहिताः कर्मभिस्तथा ।
वर्तन्ते संस्थिताः काले तान्कुरु त्वं यथा पुरा ॥ ३६ ॥
कालकर्मस्वभावाख्यैः कारणैः सकलं जगत् ।
स्वभावस्वगुणैर्युक्तं पूर्ववत्सचराचरम् ॥ ३७ ॥
माननीयस्त्वया विष्णुः पूजनीयश्च सर्वदा ।
सत्त्वगुणप्रधानत्वादधिकः सर्वतः सदा ॥ ३८ ॥
यदा यदा हि कार्यं वो भविष्यति दुरत्ययम् ।
करिष्यति पृथिव्यां वै अवतारं तदा हरिः ॥ ३९ ॥
तिर्यग्योनावथान्यत्र मानुषीं तनुमाश्रितः ।
दानवानां विनाशं वै करिष्यति जनार्दनः ॥ ४० ॥
भवोऽयं ते सहायश्च भविष्यति महाबलः ।
समुत्पाद्य सुरान्सर्वान्विहरस्व यथासुखम् ॥ ४१ ॥
ब्राह्मणाः क्षत्रिया वैश्या नानायज्ञैः सदक्षिणैः ।
यजिष्यन्ति विधानेन सर्वान्वः सुसमाहिताः ॥ ४२ ॥
मन्नामोच्चारणात्सर्वे मखेषु सकलेषु च ।
सदा तृप्ताश्च सन्तुष्टा भविष्यध्वं सुराः किल ॥ ४३ ॥
शिवश्च माननीयो वै सर्वथा यत्तमोगुणः ।
यज्ञकार्येषु सर्वेषु पूजनीयः प्रयत्नतः ॥ ४४ ॥
यदा पुनः सुराणां वै भयं दैत्याद्भविष्यति ।
शक्तयो मे तदोत्पन्ना हरिष्यन्ति सुविग्रहाः ॥ ४५ ॥
वाराही वैष्णवी गौरी नारसिंही सदाशिवा ।
एताश्चान्याश्च कार्याणि कुरु त्वं कमलोद्भव ॥ ४६ ॥
नवाक्षरमिमं मन्त्रं बीजध्यानयुतं सदा ।
जपन्सर्वाणि कार्याणि कुरु त्वं कमलोद्भव ॥ ४७ ॥
मन्त्राणामुत्तमोऽयं वै त्वं जानीहि महामते ।
हृदये ते सदा धार्यः सर्वकामार्थसिद्धये ॥ ४८ ॥
इत्युक्त्वा मां जगन्माता हरिं प्राह शुचिस्मिता ।
विष्णो व्रज गृहाणेमां महालक्ष्मीं मनोहराम् ॥ ४९ ॥
सदा वक्षःस्थले स्थाने भविता नात्र संशयः ।
क्रीडार्थं ते मया दत्ता शक्तिः सर्वार्थदा शिवा ॥ ५० ॥
त्वयेयं नावमन्तव्या माननीया च सर्वदा ।
लक्ष्मीनारायणाख्योऽयं योगो वै विहितो मया ॥ ५१ ॥
जीवनार्थं कृता यज्ञा देवानां सर्वथा मया ।
अविरोधेन सङ्गेन वर्तितव्यं त्रिभिः सदा ॥ ५२ ॥
त्वं च वेधाः शिवस्त्वेते देवा मद्गुणसम्भवाः ।
मान्याः पूज्याश्च सर्वेषां भविष्यन्ति न संशयः ॥ ५३ ॥
ये विभेदं करिष्यन्ति मानवा मूढचेतसः ।
निरयं ते गमिष्यन्ति विभेदान्नात्र संशयः ॥ ५४ ॥
यो हरिः स शिवः साक्षाद्यः शिवः स स्वयं हरिः ।
एतयोर्भेदमातिष्ठन्नरकाय भवेन्नरः ॥ ५५ ॥
तथैव द्रुहिणो ज्ञेयो नात्र कार्या विचारणा ।
अपरो गुणभेदोऽस्ति शृणु विष्णो ब्रवीमि ते ॥ ५६ ॥
मुख्यः सत्त्वगुणस्तेऽस्तु परमात्मविचिन्तने ।
गौणत्वेऽपि परौ ख्यातौ रजोगुणतमोगुणौ ॥ ५७ ॥
लक्ष्म्या सह विकारेषु नानाभेदेषु सर्वदा ।
रजोगुणयुतो भूत्वा विहरस्वानया सह ॥ ५८ ॥
वाग्बीजं कामराजं च मायाबीजं तृतीयकम् ।
मन्त्रोऽयं त्वं रमाकान्त मद्दत्तः परमार्थदः ॥ ५९ ॥
गृहीत्वा जप तं नित्यं विहरस्व यथासुखम् ।
न ते मृत्युभयं विष्णो न कालप्रभवं भयम् ॥ ६० ॥
यावदेष विहारो मे भविष्यति सुनिश्चयः ।
संहरिष्याम्यहं सर्वं यदा विश्वं चराचरम् ॥ ६१ ॥
भवन्तोऽपि तदा नूनं मयि लीना भविष्यथ ।
स्मर्तव्योऽयं सदा मन्त्रः कामदो मोक्षदस्तथा ॥ ६२ ॥
उद्गीथेन च संयुक्तः कर्तव्यः शुभमिच्छता ।
कारयित्वाथ वैकुण्ठं वस्तव्यं पुरुषोत्तम ॥ ६३ ॥
विहरस्व यथाकामं चिन्तयन्मां सनातनीम् ।
ब्रह्मोवाच
इत्युक्त्वा वासुदेवं सा त्रिगुणा प्रकृतिः परा ॥ ६४ ॥
निर्गुणा शङ्करं देवमवोचदमृतं वचः ।
देव्युवाच
गृहाण हरगौरीं त्वं महाकालीं मनोहराम् ॥ ६५ ॥
कैलासं कारयित्वा च विहरस्व यथासुखम् ।
मुख्यस्तमोगुणस्तेऽस्तु गौणौ सत्त्वरजोगुणौ ॥ ६६ ॥
विहरासुरनाशार्थं रजोगुणतमोगुणौ ।
तपस्तप्तं तथा कर्तुं स्मरणं परमात्मनः ॥ ६७ ॥
सर्वसत्त्वगुणः शान्तो गृहीतव्यः सदानघ ।
सर्वथा त्रिगुणा यूयं सृष्टिस्थित्यन्तकारकाः ॥ ६८ ॥
एभिर्विहीनं संसारे वस्तु नैवात्र कुत्रचित् ।
वस्तुमात्रं तु यद्दृश्यं संसारे त्रिगुणं हि तत् ॥ ६९ ॥
दृश्यं च निर्गुणं लोके न भूतं नो भविष्यति ।
निर्गुणः परमात्मासौ न तु दृश्यः कदाचन ॥ ७० ॥
सगुणा निर्गुणा चाहं समये शङ्करोत्तमा ।
सदाहं कारणं शम्भो न च कार्यं कदाचन ॥ ७१ ॥
सगुणा कारणत्वाद्वै निर्गुणा पुरुषान्तिके ।
महत्तत्त्वमहङ्कारो गुणाः शब्दादयस्तथा ॥ ७२ ॥
कार्यकारणरूपेण संसरन्ते त्वहर्निशम् ॥
सदुद्भूतस्त्वहङ्कारस्तेनाहं कारणं शिवा ॥ ७३ ॥
अहङ्कारश्च मे कार्यं त्रिगुणोऽसौ प्रतिष्ठितः ।
अहङ्कारान्महत्तत्त्वं बुद्धिः सा परिकीर्तिता ॥ ७४ ॥
महत्तत्त्वं हि कार्यं स्यादहङ्कारो हि कारणम् ।
तन्मात्राणि त्वहङ्कारादुत्पद्यन्ते सदैव हि ॥ ७५ ॥
कारणं पञ्चभूतानां तानि सर्वसमुद्भवे ।
कर्मेन्द्रियाणि पञ्चैव पञ्च ज्ञानेन्द्रियाणि च ॥ ७६ ॥
महाभूतानि पञ्चैव मनः षोडशमेव च ।
कार्यञ्च कारणञ्चैव गणोऽयं षोडशात्मकः ॥ ७७ ॥
परमात्मा पुमानाद्यो न कार्यं न च कारणम् ।
एवं समुद्भवः शम्भो सर्वेषामादिसम्भवे ॥ ७८ ॥
सङ्क्षेपेण मया प्रोक्तस्तव तत्र समुद्भवः ।
व्रजन्त्वद्य विमानेन कार्यार्थं मम सत्तमाः ॥ ७९ ॥
स्मरणाद्दर्शनं तुभ्यं दास्येऽहं विषमे स्थिते ।
स्मर्तव्याहं सदा देवाः परमात्मा सनातनः ॥ ८० ॥
उभयोः स्मरणादेव कार्यसिद्धिरसंशयम् ।
ब्रह्मोवाच
इत्युक्त्वा विससर्जास्मान्दत्त्वा शक्तीः सुसंस्कृताः ॥ ८१ ॥
विष्णवेऽथ महालक्ष्मीं महाकालीं शिवाय च ।
महासरस्वतीं मह्यं स्थानात्तस्माद्विसर्जिताः ॥ ८२ ॥
स्थलान्तरं समासाद्य ते जाताः पुरुषा वयम् ।
चिन्तयन्तः स्वरूपं तत्प्रभावं परमाद्भुतम् ॥ ८३ ॥
विमानं तत्समासाद्य संरूढास्तत्र वै त्रयः ।
न द्वीपोऽसौ न सा देवी सुधासिन्धुस्तथैव च ॥
पुनर्दृष्टं विमानं वै तत्रास्माभिर्न चान्यथा ॥ ८४ ॥
आसाद्य तस्मिन्वितते विमाने
प्राप्ता वयं पङ्कजसन्निधौ च ।
महार्णवे यत्र हतौ दुरत्ययौ
मुरारिणा तौ मधुकैटभाख्यौ ॥ ८५ ॥
इति श्रीदेवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां
तृतीयस्कन्धे ब्रह्मणे श्रीदेव्या उपदेशवर्णनं नाम षष्ठोऽध्यायः ॥ ६ ॥
देवीचे श्रेष्ठत्व आणि त्रिगुणाञ्चे विवेचन
ब्रह्मदेव नारदाला म्हणाला, “हे नारदा, याप्रमाणे मी त्या देवीला प्रश्न विचारल्यावर विनम्रभावाने तिच्या पुढे नत झालो. तेव्हा ती देवी मला स्पष्टपणे साङ्गू लागली.“देवी म्हणाली, “मी आणि परमात्मा पुरुष या दोघाम्मध्ये नित्य ऐक्यच असते. आम्हात भेद नाही. जो तो परमात्मा तो मीच आहे आणि ही शक्ती जी मी आहे तोच परमात्मा आहे. पण केवळ अज्ञानामुळे हा भेद जाणवत असतो. आम्हामध्ये जे सूक्ष्म अन्तर आहे ते ज्याने जाणले तोच खरा बुद्धीमान आहे आणि तो जाणकार संसारापासून सत्वर मुक्त होतो हे अगदी निःसंशय.
सनातन नित्य ब्रह्म हे एकच अद्वितीय आहे. पण सृष्टीच्या उत्पत्तीकाली त्याला द्वैतभाव प्राप्त होतो. त्याला उपाधीञ्चा संसर्ग होऊन दीपाप्रमाणे ते दोन प्रकारचे भासू लागते. छायेप्रमाणे अथवा प्रतिबिम्बाप्रमाणे आम्हा उभयताञ्चा सम्बन्ध एकच आहे.
हे ब्रह्मदेवा, उत्पत्तीच्याकाली सृष्टी निर्माण करण्याकरता हा भेद उत्पन्न होत असतो. सारांश, द्वैत असताही दृश्यादृश्य स्वरूपाचा हा भेद कायमच राहात असतो. सृष्टीचा क्षय झाला असता स्त्री, पुरुष किंवा नपुंसक ह्यापैकी मी कोणीच नसते, पण सृष्टी स्थित असताना मात्र बुद्धीने कल्पिलेला हा भेदभाव नित्य टिकून राहतो.
बुद्धी, श्री, धृति, कीर्ती, स्मृती, श्रद्धा, मेधा, दया, लज्जा, क्षुधा, तृषा व क्षमाही मीच आहे. शिवाय कान्ती, शान्ती, जिज्ञासा, निद्रा, तन्द्रा, जरा, अजरा, विद्या, अविद्या, स्पृहा, वाञ्छा, शक्ति, अशक्ति मीच आहे आणि वसा, मज्जा, त्वचा, दृष्टी, सत्य, असत्य, परा, पश्यति, मध्यमा वाणी व नानाप्रकारच्या कला माझ्या मीच आहे.
असे पहा की, संसारात कोणत्या स्वरूपात मी नाही ? माझ्याशिवाय या जगतात काय आहे ? हे ब्रह्मदेवा, या जगाचे सारसर्वस्वही मीच आहे हे तू निश्चित समजून मनामध्ये ठेव. ही माझी सर्व निश्चित स्वरूपाची विविध रूपे असून याशिवाय असम्बन्ध असे काय आहे, साङ्ग.
हे ब्रह्मदेवा, या चराचर सृष्टीत मीच काय ती वास करून राहिले आहे. खरोखरच सर्व देवाञ्चे ठिकाणी नाना प्रकारची रूपे धारण करून मीच वास करीत असते आणि मी शक्ती असल्यामुळे मीच पराक्रम करते.
गौरी, ब्राह्मी, रौद्री, वाराही, वैष्णवी, शिवा, वारुणी, कौबेरी, नारसिंही, वासवी या सर्व शक्ति ज्या आढळतात ती सर्व माझीच रूपे आहेत.
सम्पूर्ण पदार्थ निर्माण झाल्यावर मीच त्याञ्च्यात वास करते आणि मीच सर्व कार्ये करून फक्त निमित्त म्हणून त्या पुरुषाला पुढे करते.
उदकामध्ये शीतलता, अग्नीमध्ये उष्णता, सूर्याचे प्रभेचे ठिकाणी प्रखरता, चन्द्राचे ठिकाणी शीतल चन्द्रिका, या सर्व रूपान्तून मीच असते. हे ब्रह्मदेवा, ह्या संसारातील कोणत्याही प्राणिमात्राचा मी जर त्याग केला तर तो प्राणी कधीही चलनवलन तत्पर राहणार नाही. कारण माझ्याशिवाय त्याला तेवढे सामर्थ्य असणार नाही हे मी तुला कृतनिश्चयाने साङ्गून ठेवते. तू लक्षात ठेव.
मी जर त्याग केला तर प्रत्यक्ष शङ्करही कोणत्याही दैत्याचा वध करण्यास समर्थ होणार नाही आणि लोकही शक्तीहीन पुरुषाला अति दुर्बल समजतात. म्हणून ते शङ्करालाही क्षुद्र लेखतील. शक्तीहीन पुरुषाला सर्व लोक असे अत्यन्त क्षुल्लक समजतात. तसे रुद्रहीन अथवा विष्णूहीन पुरुषाला ते समजत नाहीत. जगतामध्ये पडलेल्या, अडखळलेल्या, भ्यालेल्या, स्वस्थ बसलेल्या आणि शत्रूचे आधीन झालेल्या पुरुषाला अशक्त म्हणून सर्वजण ओळखतात. पण अरुद्र म्हणजे रुद्रहीन पुरुषाला तसे ओळखण्याचे कारण नाही.
तुला सृष्टी उत्पन्न करण्याची जी इच्छा होते त्याचे कारण, प्रेरणा देणारी शक्ती, हेच आहे. तुला जेव्हा प्रेरणेने शक्ती मिळते तेव्हाच तू हे सर्व जगत् उत्पन्न करण्यास समर्थ होतोस. विष्णू, शङ्कर, इन्द्र, अग्नि, सूर्य, चन्द्र, यम, त्वष्टा, वरुण याञ्चे बाबतीतही असेच आहे. पृथ्वीला जेव्हा शक्ती प्राप्त होते तेव्हाच ती हे प्राणी वगैरे चराचर धारण करण्यास समर्थ होत असते. नाही तर शक्ति नसल्यास ती क्षुद्र परमाणूही धारण करण्यास निःसंशय असमर्थ होईल.
तसेच शेष, कूर्म आणि इतर सर्वच्या सर्व दिग्गज माझ्या शक्तीच्या प्रेरणेनेच आपापली कार्ये करण्यास समर्थ होत असतात. मी अशी एकमेव शक्ती आहे की मी एका क्षणात सम्पूर्ण उदक प्राशन करीन, अग्नीचा निमिषार्धात पूर्णपणे संहार करीन अथवा वायूचेही सत्वर स्तम्भन करून टाकीन. थोडक्यात साङ्गायचे म्हणजे जे मनात आणीन ते मी सत्वर करू शकेन. मला अशक्य काही नाही.
कोणतेही मूलतः नसलेले तत्त्व निर्माण होत असते असे तू कदापीही मनात आणू नकोस. ज्या प्रमाणे मृत्तिकेचे मूळ स्वरूपात बदल होऊन त्याचा पिण्ड तयार केला असता मृत्तिकापण नाहीसे होते. पिण्डाला आकार देऊन घट केल्यावर, भाजून काढल्यावर, त्याला खापराची भावना जडते व घटत्व प्राप्त होते आणि त्याचे मूळ स्वरूप लक्षात येईनासे होते, तसेच एका स्वरूपातून दुसर्या स्वरूपात गेल्यावर पहिल्याचा अभाव होत असतो.
आज या ठिकाणी पृथ्वी घट स्वरूपात आढळत नाही. मग ती कोणीकडे बरे गेली ? अशा प्रकारचा प्रश्न उत्पन्न झाल्यावर त्या घटरूप पृथ्वीचे परमाणू झाले आहेत असे निःसंशय समजावे. असे लोक विचार करीत म्हणत असतात.
शाश्वत, क्षणिक, शून्य, नित्य, अनित्य, सकर्तृक आणि अहङ्कार याहीपेक्षा वेगळे असे जे प्राचीन असलेले, सप्त भेदान्नी युक्त असलेले जे महतत्त्व त्याचा हे ब्रह्मदेवा, तू सत्वर स्वीकार कर. हा अहङ्कार त्यापासूनच उत्पन्न झालेला आहे. म्हणून त्याचपासून तू पूर्ववत् सर्व भूते उत्पन्न कर.
आता तुम्ही येथून लवकर जा, स्वतःसाठी उत्तम स्थाने निर्माण करा आणि तेथेच सिद्ध रहा. केवळ दैववशात वेळोवेळी उत्पन्न झाल्यावर स्वतःची प्राप्त कर्मे नित्यनेमाने करीत जा.
हे ब्रह्मदेवा, साम्प्रत मी तुला ही महासरस्वती नावाची अत्यन्त सुस्वरूप व योग्य शक्ती देत आहे. तिचा तू स्वीकार कर. ही शक्ती रजोगुणानी युक्त असून, पहा बरे, तिचे हास्यही लाघवी आहे. ह्या दिव्य स्त्रीने शुभ्र वस्त्र परिधान केले आहे.
दिव्य अलङ्कारान्नी ती विभूषित आहे व साम्प्रत ती उत्कृष्ठ सिंहासनावर आरूढ झालेली आहे. क्रीडेसाठी तू या सहचारिणीचा स्वीकार कर. या प्रियेला तू अतिशय पूज्य मान. माझ्या या विभूतीची तू कधीही अवमान करू नकोस. तू इच्यासह आता सत्वर सत्यलोकात प्रयाण कर आणि महत्तत्त्वरूप बीजाच्या आधाराने तू सर्व चतुर्विध जगत् त्वरित उत्पन्न कर. प्रलय कालात जीव, कर्म ह्यांसह सर्व शरीरे, लिङ्गे अत्यन्त लीन होऊन राहिली आहेत. ती तू पूर्ववत स्थितीला आणून प्रकट कर. काल, कर्म आणि स्वभाव ह्या कारणान्नी मुक्त होऊन तू पूर्वीप्रमाणेच हे सम्पूर्ण जगत् उत्पन्न कर आणि या जगात स्वभावरूप असलेले सत्व वगैरे सर्व गुण पूर्ववत् त्या त्या ठायी निर्माण कर.
विष्णूजवळ सत्वगुणाचे प्राधान्य अधिक आहे. म्हणून तो सर्वश्रेष्ठ असल्याने तू त्याचा आदराने मान राखत जा. त्याचे नित्य पूजन करीत जा. जेव्हा जेव्हा तुला काही तरी सङ्कटे आल्यामुळे कार्यात दुर्घटता उत्पन्न झालेली आढळेल तेव्हा तेव्हा तू या श्रीहरीला शरण जा. तो पृथ्वीवर अवतार धारण करून सर्व व्यवस्थित करील. तिर्यग्योनीत अथवा मानवी योनीत हा जनार्दन अवतार धारण करून सर्व दानवाञ्चा अथवा दुष्टचक्राचा नाश करील.
त्याप्रमाणे हा महाबलाढ्य रुद्रही तुला तुझ्या कार्यात नित्य सहाय्य करीत राहील. म्हणून इतर सर्व देव उत्पन्न करून तू यथेच्छ क्रीडा कर. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य प्रसन्न चित्ताने व स्थिर मनाने अमूल्य दक्षिणाञ्च्या योगाने विधिपूर्वक यज्ञ करून तुम्हा सर्वाञ्चे नित्य भजन करतील. माझ्या ‘स्वाहा’ या नावाच्या उच्चारामुळे सर्व यज्ञात तुम्ही सर्व देव खरोखरच अत्यन्त तृप्त व्हाल आणि सन्तुष्ट व्हाल.
शिव तमोगुणी असल्यामुळे त्याला सर्वान्नी अत्यन्त मान देऊन त्याचे सर्व प्रकारे पूजन करावे व सर्व यज्ञामध्ये त्याचे विधीपूर्वक स्तवन करून त्याला प्रयत्नपूर्वक पूजावे. देवान्ना जेव्हा जेव्हा दैत्याम्पासून पुनः भय उत्पन्न होईल तेव्हा वाराही, वैष्णवी, गौरी, नारसिंही व सदाशिवा ह्या आणि इतरही माझ्या शक्ती उत्कृष्ट व अनुपमेय देह धारण करतील आणि देवशत्रूञ्चा संहार करून सङ्कटाञ्चा परिहार करतील.
हे ब्रह्मदेवा, तू सत्वर आपल्या कार्यास सुरुवात कर. सर्व मन्त्रामध्ये हा मन्त्र उत्कृष्ट आहे हे लक्षात ठेव आणि हे महाबुद्धिशाली ब्रह्मदेवा, सर्व अर्थ-काम सिद्धी जावेत म्हणूनच तू हा मन्त्र नेहमी हृदयात धारण करून त्याचे मनोमन चिन्तन कर.
असे त्या सुहास्यवदना अदिमाया जगन्मातेने मला साङ्गितले त्यानन्तर हे नारदा, ती विष्णूला म्हणाली, हे भगवान विष्णो, हे महाभाग्यशाली, आता तू सर्वाङ्गसुन्दर अशा मनोहर लक्ष्मीचा स्वीकार कर आणि स्वस्थानी जा. ही शक्ती चिरन्तन तुझ्या हृदयामध्ये स्थिर राहील. ही सर्वाञ्चे मनोरथ परिपूर्ण करणारी कल्याणी आहे. ही शक्ती मी तुला देत आहे. तिच्यासह तू यथेच्छ क्रीडा कर. मात्र हिचा अवमान कधीही करू नकोस. तू नित्य हिला मान देत जा. कारण लक्ष्मी-नारायण योग मी मुद्दाम घडवून आणला आहे. तसेच सर्व देवाञ्ची सर्वतोपरीने उत्तम उपजीविका चालावी म्हणून मी हे सर्व यज्ञ निर्माण केले आहेत. तसेच आता तुम्हाला कसलीही कमतरता नाही. तुम्ही सर्वजण एक विचाराने एकमेकाञ्च्या सहकार्याने विरोध न करता रहात जा. तुमच्यात नेहमी एकमत असू द्या.
शिव तमोगुणी असल्यामुळे त्याला सर्वान्नी अत्यन्त मान देऊन त्याचे सर्व प्रकारे पूजन करावे व सर्व यज्ञामध्ये त्याचे विधीपूर्वक स्तवन करून त्याला प्रयत्नपूर्वक पूजावे. देवान्ना जेव्हा जेव्हा दैत्याम्पासून पुनः भय उत्पन्न होईल तेव्हा वाराही, वैष्णवी, गौरी, नारसिंही व सदाशिवा ह्या आणि इतरही माझ्या शक्ती उत्कृष्ट व अनुपमेय देह धारण करतील आणि देवशत्रूञ्चा संहार करून सङ्कटाञ्चा परिहार करतील.
हे ब्रह्मदेवा, तू सत्वर आपल्या कार्यास सुरुवात कर. सर्व मन्त्रामध्ये हा मन्त्र उत्कृष्ट आहे हे लक्षात ठेव आणि हे महाबुद्धिशाली ब्रह्मदेवा, सर्व अर्थ-काम सिद्धी जावेत म्हणूनच तू हा मन्त्र नेहमी हृदयात धारण करून त्याचे मनोमन चिन्तन कर.
असे त्या सुहास्यवदना अदिमाया जगन्मातेने मला साङ्गितले त्यानन्तर हे नारदा, ती विष्णूला म्हणाली, हे भगवान विष्णो, हे महाभाग्यशाली, आता तू सर्वाङ्गसुन्दर अशा मनोहर लक्ष्मीचा स्वीकार कर आणि स्वस्थानी जा. ही शक्ती चिरन्तन तुझ्या हृदयामध्ये स्थिर राहील. ही सर्वाञ्चे मनोरथ परिपूर्ण करणारी कल्याणी आहे. ही शक्ती मी तुला देत आहे. तिच्यासह तू यथेच्छ क्रीडा कर. मात्र हिचा अवमान कधीही करू नकोस. तू नित्य हिला मान देत जा. कारण लक्ष्मी-नारायण योग मी मुद्दाम घडवून आणला आहे. तसेच सर्व देवाञ्ची सर्वतोपरीने उत्तम उपजीविका चालावी म्हणून मी हे सर्व यज्ञ निर्माण केले आहेत. तसेच आता तुम्हाला कसलीही कमतरता नाही. तुम्ही सर्वजण एक विचाराने एकमेकाञ्च्या सहकार्याने विरोध न करता रहात जा. तुमच्यात नेहमी एकमत असू द्या.
हे विष्णो, तू ब्रह्मदेव आणि शिव हे माझ्याच गुणाम्पासून तुम्ही उत्पन्न झाला आहात. म्हणून सर्व देव व इतरे जनही तुम्हाला अत्यन्त मान देतील व पूज्य लेखतील यात तिळमात्र खोटे नाही. तुम्हा तिघाञ्च्याही स्वरूपात जे मन्दमती मूढ मानव भेदभाव धारण करतील. ते पुरुष निःसंशय नरकात जातील. ब्रह्मदेवासम्बन्धी कुणीही संशय बाळगण्याचे कारण नाही.
हे विष्णो, तुमच्यामध्ये एक वेगळाच गुणभेद आहे. तो आता मी साङ्गते. तुम्ही लक्ष देऊन ऐका.
परमात्म्याचे चिन्तन करण्यासाठी तुझ्याकडे सत्वगुण अधिक प्रमाणात वास करील आणि रजोगुण व तमोगुण हे गौण असतील. ते तुझ्या ठिकाणी अल्प आहेत. तेव्हा विविध प्रकारचे काम विकार उत्पन्न होताच तू लक्ष्मीसह यथेच्छ क्रीडा करीत जा. कारण तू रजोगुणाने अति सम्पन्न आहेस. वाग्बीज, कामबीज आणि तिसरा मायाबीज या सर्वान्नी परिपूर्ण असा हा मन्त्र मी तुला दिला आहे. तो सर्व मनोरथ पूर्ण करणारा मन्त्र आहे. त्याचा आता तू स्वीकार कर, या मन्त्राने नित्य जप करीत जा आणि सुखेनैव क्रीडा करीत रहा. हे विष्णो, ही माझीच क्रीडा असून ही क्रीडा चालू असेपर्यन्त तुला मृत्यूचे अथवा कालाचे कसलेही भय नाही. पण जेव्हा मी स्वेच्छेने या चराचर सृष्टीजाताचा संहार करीन. तेव्हा तुम्ही तिघेही माझ्यामध्ये पुनः लीन व्हाल.
हे पुरुषोत्तमा, मी दिलेल्या कामप्रद मन्त्राच्या साह्याने प्रणवासह शुभफलाची इच्छा करणार्या पुरुषाने माझे स्मरण करावे. आता हे विष्णो, वैकुण्ठ लोक सत्वर निर्माण करून तू येथे वास्तव्य कर आणि सनातन महाशक्ती देवी जी मी, त्या माझे तू चिन्तन करीत निःशङ्क मनाने क्रीडा करीत राहा. तुझ्यावर कसलेही सङ्कट येणार नाही.”
अशा प्रकारे भगवान विष्णूला देवीने साङ्गितले आणि वस्तुतः सत्व, रज, तम या त्रिगुणान्नी युक्त असूनही निर्गुण असणार्या त्या महामायेने, त्या पराकृतीने महादेवाला उद्देशून अत्यन्त कल्याणप्रद व अमृततुल्य भाषण केले. ती म्हणाली, “हे शङ्करा, तू आता या नयनमनोहर आणि महाकाली या नावाने प्रसिद्ध असलेल्या व माझ्या नावाने प्रसिद्ध असलेल्या माझ्या गौरी या शक्तीचा स्वीकार कर आणि हिच्यासह तू सुखाने नित्य क्रीडा करीत रहा. तुझ्या ठिकाणी तमोगुण हा प्रधान गुण असून सत्वगुण व रजोगुण हे अत्यन्त गौण गुण आहेत. केवळ क्रीडेसाठी तुझ्या ठिकाणी रजोगुण व दैत्याञ्चा संहार करण्यासाठी तमोगुण हे दोन्ही गुण प्रामुख्याने तुझ्यात स्थिर राहतील.
पण हे निष्पाप शिवा, तपश्चर्या करण्यासाठी आणि परमात्म्याचे स्मरण करण्यासाठी तू सर्वदा शान्त अशा सत्वगुणाचा स्वीकार करीत जा.
हे ब्रह्मा, विष्णू, महेश्वर ही जगताची उत्पत्ती, स्थिती आणि लय करण्यासाठी तुम्ही तत्पर असून तुम्ही त्रिगुणात्मक आहात. या तिन्ही गुणांशिवाय उत्पन्न झालेली एकही वस्तू या जगतामध्ये नाही. या संसारात जे म्हणून दृश्य वस्तुमात्रक आहे, ते या त्रिगुणान्नी युक्तच आहे.
दृश्य पण निर्गुण अशी एकही वस्तू या पृथ्वीवर उत्पन्न झाली नाही आणि पुढेही होणार नाही. हा परमात्मा केवळ निर्गुण आहे म्हणूनच केव्हाही तो दृश्य होणे शक्य नाही.
हे शङ्करा, पण मी अशी एक सर्वोत्तम देवी आहे की वेळेनुसार मी सगुण अथवा निर्गुण होत असते. हे शम्भो, माझे कार्यरूपाने अस्तित्व नसून मी कारण रूपाने स्थिर आहे. पण जेव्हा मी कारण रूप असते तेव्हा मी सगुण होते आणि जेव्हा मी पुरुषाच्या सन्निध असते, तेव्हा माझे स्वरूप निर्गुणात्मक असते.
महातत्त्व, अहङ्कार आणि शब्द इत्यादी गुण कार्यकारणपरत्वे सर्व व्यापून टाकतात. सन्तापापासून अहङ्काराची निर्मिती झाली असल्याकारणाने मीच ती कल्याणीच्या अहङ्काराचे कारण आहे. हा त्रिगुणात्मक स्वरूपाचा अहङ्कार मीच निर्माण करते. कारण ते माझे एक कार्यच आहे. या अहङ्कारापासून एक अद्भूत महतत्त्व उत्पन्न झाले आहे याला बुद्धि म्हणतात. महतत्त्व हे कार्य असून अहङ्कार हे त्याचे कारण आहे.
या अहङ्कारापासून ही सर्व सूक्ष्मभूते सर्वदा निर्माण होत असतात. जेव्हा सर्व जगताची उत्पत्ति होते. तेव्हा या सूक्ष्म भूताम्पासून श्रेष्ठ पञ्चमहाभूते निर्माण होतात. पाच कर्मेन्द्रिये, पाच ज्ञानेन्द्रिये, पाच महाभूते आणि सोळावे मन असा कार्य कारण मिळून षोडशात्मक समुदाय निर्माण झाला आहे.
आदि पुरुष जो परमात्मा तो वस्तुतः कार्यही नाही आणि कारणही नाही. म्हणून तर हे शम्भो, या आदि सृष्टीत असलेल्या सर्वाञ्चीच माझ्यापासून उत्पत्ति झाली आहे व त्याच प्रकाराने त्या सृष्टीत तुझी उत्पत्ति झालेली आहे.
ही उत्पत्ति साम्प्रत मी तुला सङ्क्षेपाने साङ्गितली आहे. हे सज्जन श्रेष्ठान्नो, माझी क्रीडा म्हणून माझ्या कार्यासाठी आता तुम्ही विमानात बसून सत्वर जा. काही सङ्कट कोसळल्यास सत्वर माझे केवळ स्मरण करा. मी त्वरित दर्शन देईन आणि तुमच्या सङ्कटाञ्चा नाश करीन.
हे देवान्नो माझे आणि त्या सनातन परमात्म्याचे तुम्ही नित्य मनामध्ये चिन्तन करीत राहा. कारण आम्हा उभयताञ्चे स्मरण केल्यास तुमच्या कार्याचे सिद्धी होईल.”
अशाप्रकारे देवीने तिघान्नाही कार्य तत्पर केल्यावर आम्हा तिघान्ना तीन शक्ती दिल्या. विष्णूला महालक्ष्मी, शिवाला महाकाली आणि मला महासरस्वती. अशा या सुसंस्कृत तीन शक्ती आम्हाला दिल्यावर तिने आपल्या त्या शक्तींसह ते स्थान सोडून जाण्याची आम्हाला आज्ञा केली. तेथून आम्ही दुसर्या स्थळी प्राप्त होताच पूर्ववत् पुरुष स्थितीत आलो.
त्या महामायेच्या स्वभावाचे आम्ही स्वरूप चिन्तन करू लागलो. तिच्या अद्भूत प्रभावाचे स्मरण करीत आम्ही आपापल्या शक्तींसह त्या अद्भूत विमानाजवळ येऊन विमानात बसलो. पण ते अद्वितीय विमान इतके प्रचण्ड होते की थोड्याच वेळात ते द्वीप, ती परादेवी, तो सुधासागर आणि ते विमानही आम्हास दिसेनासे झाले हे अगदी सत्य आहे.
थोडक्यात साङ्गायचे म्हणजे त्या विमानात बसल्यावर महासागरात ज्या ठिकाणी जघन प्रदेश निर्माण करून त्या अतिबलाढ्य मधुकैटभ राक्षसाञ्चा विष्णूने वध केला होता तेथे त्या कमलाचे जवळ आम्ही सत्वर येऊन पोहोचलो.
अध्याय सहावा समाप्त
GO TOP