मराठी
(आतां तप्तमुद्रादि धारण साङ्गतो.)
याविषयी विष्णु आणि आश्वलायन ह्मणतात. “शङ्ख चक्र इत्यादिकान्नी अङ्कन करणे ह्मणजे मुद्रा धारण करणे, गायन, व नृत्य करणे हा एकजातीचा (शूद्राचा) धर्म आहे. द्विजातीञ्चा (ब्राह्मण क्षत्रिय वैश्याञ्चा) कदापि होणार नाही1." पुरुषार्थप्रबोध, व शिवस वैख इत्यादि ग्रन्थामध्ये “स्त्रीशूद्रान्नीहि2 भस्म धारण करावें.” असे साङ्गितले आहे.
इति कमलाकरभट्टविरचिते शूद्रधर्मप्रकाशे शूद्रश्राद्धनिर्णयः समाप्तः ॥
-
“तप्तमुद्रा धारण शूद्राने करावे; ब्राह्मणान्नी करूं नये.” असा येथे निषेध केला आहे; व साम्प्रत मावसं प्रदायी सर्व लोक डागून घेतात, व त्याविषयीं “अतप्ततनून०’ इत्यादि श्रुतिप्रामाण्य देतात व या श्रुतीचा ते जसा अर्थ करितात, तसा मानल्यास तो प्रकार सप्रमाण होईल; परन्तु वास्तविक पाहता तसा अर्थ मुळीच होत नाही असे वाटते. ते कसेंही असो, पण एकन्दरीत हा विषय मोठा वादग्रस्त आहे, याम्त संशय नाही.तो ज्यान्ना पाहण्याची इच्छा असेल त्याण्णी रामार्चनचन्द्रिका व शिवार्चनचन्द्रिका हे ग्रम्थ पहावे. ह्मणजे विधिनिषेधाञ्ची गर्दी दृष्टोत्पत्तीस येईल. त्यापैकी काही मासला पाहणे असल्यास निणयसिन्धुप०२ आषाढ. ↩︎
-
येथे “स्त्रियान्नी भस्म धारण करावे.” असें जें साङ्गितले आहे ते. विधवास्त्रीविषयक असावे असे वाट ते. कारण, माहाराष्ट्र, गुजेर वगैरे देशाम्त सुवासिनीन्नी भरभ लावल्याचे पाहाण्याम्त येत नाही. केवळ लिङ्गाइ ताम्त मात्र हा प्रचार आहे. तसेम्च शूद्रलोक मुख्यत्वें भस्म धारण करतात असे नाही. द्रविड केरळ वगैरे देशाम्त ब्राह्मण जातीच्या देखील सुवासिनी त्रिया, व शूद्र भस्म धारण करितात. हे प्रत्यक्ष पाहिले आहे. सुवासिनी स्त्रियाम्स अत्यावश्यक असलेलें मङ्गलसूत्र तर सर्व मलबार देशाम्त दृष्टि पडणे कठीण! ↩︎