१३ तिलकविधिः

मराठी

शूद्राम्स तिलकविधि साङ्गतो. याविषयी पराशरपुराणाम्त साङ्गितले आहे की, “ऊर्ध्वपुण्ड्र (ऊभा नाम), त्रिपुण्ड्र1 (आड वा दुबोटी नाम), वर्तुल (वाटोळे), चतुरस्र (चौकोनी), अर्धचन्द्र इत्यादिक गन्धाची चिन्हें वेदनिष्ठ2 पुरुषाने धारण करूं नयेत.” या वाक्यात “वेदनिष्ठ” असें झटले आहे. यावरून पूर्वी साङ्गितलेल्या प्रकारान्नी गम्ध लावण्याविषयीं शूद्रास आज्ञा दिल्यासारखे आहे. मदन पारिजात ग्रन्थाम्त ब्रह्मपुराणवचन असें आहे की, “ब्राह्मणाने उभा नाम लावावा. क्षत्रियाने आडवा दुबोटी लावावा, वैश्याने अर्धचन्द्राकार लावावा, व शूद्राने वाटोळा तिलक ला वावा.” ( या वचनाने वरील वचनाची वर्णपरत्वें व्यवस्था केली आहे.)


  1. दुबोटी गंध लावितात त्याच्या तीन रेषा होतात ह्मणून त्यासच हें नांव आहे. ↩︎

  2. ब्राह्मणास नुस्ते वाटोळे गम्ध (टिकला ) लावण्याविषयी निषेध बहत आहेत. ते आचारार्क व कमलाकराह्निक इत्यादिकाम्त पाहावे. ↩︎