०१ पहिल्या आवृत्तीची प्रस्तावना

— - न जातु कामान्न भयान्न लोभाद्धर्मं त्यजेज्जीवितस्यापि हेतोः । धर्मो नित्यः सुखदुःखे त्वनित्ये जीवो नित्यो हेतुरस्य त्वनित्यः ॥१॥ सांप्रतकालीं आपल्या देशांत विद्येचा दिवसानुदिवस विशेष फैलाव होत असल्या कारणानें ज्ञानाची वृद्धि होत आहे. त्यामुळें ज्ञानाचे अंकुर वाढत जात असून लौकिक व शास्त्रीय विषयांचा शोध करण्याकडे कित्येक सुशिक्षित लोकांचे लक्ष लागलें आहे. ही गोष्ट मोठी अभिनंदनीय आहे. आणि यावरून भावी उत्तम स्थितीचें अनुमान साहजिक होतें. आतां या सर्व गोष्टींला आपल्या देशांत छापण्याची कला प्रसृत होऊन तिच्या सुलभतेने निरनिराळ्या विषयांचे जे अनेक ग्रंथ छापून प्रसिद्ध होत आहेत हें एक कारण आहे. याविषयीं एका कवीनें असें मटलें आहे की-" ज्या देशांत ग्रंथ बहुत असतील, व जेथे त्यांचे मर्म जाणणारे विपुल असतील तेथें विद्या नृत्य करतात. तो देश प्रगोपक्षांही अधिक होय. कारण, स्वर्गांत याचा लाभ होत नाहीं यामुळे कित्येक देवानीं लोकांतरांत जाऊन त्याचा लाभ घेतला आहे." ____ अस्तु. याप्रमाणे ज्ञानादिकांचा लाभ करून देणा-या उत्तम ग्रन्थांचें परिशीलन करणे हें अत्यावश्यक आहे. सांप्रत लौकिकविषयांचे ज्ञान होण्यास साधनीभूत असे ग्रंथ बहुत होत आहेत व शास्त्रीय विषयांचीही देशभाषेंत भाषांतरे होत आहेत, परंतु पारलौकिक सुखप्राप्तीचें परम साधन जो धर्म तत्प्रतिपादक शास्त्राचें ज्ञान होणें हें अत्यावश्यक आहे. याकरितां धर्मशास्त्रीय ग्रंथांचीं देशभाषेंत भाषांतरे झालीं पाहिजेत. त्याप्रमाणें काही पुस्तकें प्रसिद्ध झालीं आहेत. थोड्या दिवसांपूर्वी सर्वमान्य धर्मसिंधु नांवाच्या ग्रंथाचें मराठी भाषांतर आम्हीं प्रसिद्ध केले, त्या वेळेस कित्येक हिनेच्छुंनी शूद्रकमलाकर याचेंही भाषांतर करण्याविषयीं सुचविलें. त्याअन्वयें आम्हीं प्रसिद्ध महापंडित कमलाकरभट्ट यांनी केलेल्या शुद्रकमलाकर अथवा शूद्रधर्मतत्त्वप्रकाश याचें मराठी भाषांतर करवून वाचकांस सादर केले आहे. आतां या ग्रंथापासून उपयोग कितपत होईल हा निर्णय करण्याचे काम सुज्ञ वाचकांवर अवलंबून आहे. हे भाषांतर आम्हीं वे. शा. रा. रा. वामनशास्त्री इस्लामपूरकर यांजकडून करविलें आहे. जावजी दादाजी.

.